Ad will apear here
Next
मंजुश्री ओक यांचा विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे १३ तास सादरीकरण
गिनिज बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न
मंजुश्री ओक

पुणे : भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडण्यासाठी पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या अनोख्या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होण्याची शक्यता आहे. 

‘अमृतवाणी’ या नावाने सादर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाची दखल ‘गिनिज’मध्ये घेतली जाण्यासाठीच्या सर्व अटी मंजुश्री ओक यांनी या कार्यक्रमात पूर्ण केल्या असून, आता ‘गिनिज’कडून हा विक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. यापूर्वी एकाच कार्यक्रमात ७६ भाषांमधील गाणी गाण्याचा विक्रम नोंदला गेला असून, सलग १३ तासांत १२२ भारतीय भाषांमधील गाणी सादर करण्याचा हा पहिलाच जागतिक विक्रम ठरेल.

श्री यशलक्ष्मी आर्ट आणि मंजुश्री ओक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आदिवासी विकास आणि संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र, हेरिटेज द आर्ट लेगसी आणि जनगणना कार्यालय यांचे सहकार्य लाभले होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी साडेदहा ते रात्री साडेअकरा या वेळेत हा कार्यक्रम झाला.


या कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांची निवड काळजीपूर्वक करण्यात आली होती. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता. पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, अभंग, देशभक्तिपर गीते, भावगीते, लावणी अशा विविध प्रकारांतील गीतांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गीते वाद्यवृंदाच्या साथीने गायली गेली.    

मंजुश्री ओक यांनी यापूर्वी २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये दोन वेगळे विक्रम नोंदविले आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZXKCF
Similar Posts
१० ऑक्टोबरला होणार विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे सलग १३ तास सादरीकरण पुणे : सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी एक अनोखा उपक्रम ठरवला आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी त्या सलग १३ तास १२२ भारतीय भाषांमधील गाणी सादर करणार आहेत. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंडित
तीन पिढ्यांचा नृत्यसंगम ‘नृत्य धारा’ पुणे : वारसा आणि परंपरेच्या पायावर कथक नृत्यपरंपरा खऱ्या अर्थाने बहरत गेली. पिढीगणिक समृद्ध होत गेलेल्या कथक नृत्यकलेची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना शनिवार, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘मनीषा नृत्यालय’ यांच्यातर्फे ‘नृत्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
गायिका अर्चना पोतनीस यांची सांगीतिक मुलाखत (व्हिडिओ) आपल्या गोड, सुरेल आवाजाने संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका अर्चना पोतनीस यांच्या सांगीतिक मुलाखतीचं आयोजन नुकतंच सूर-सखी मंचातर्फे करण्यात आलं होतं.
‘संगीत आनंदासाठी आहे, मुलांना त्याचा ताण देऊ नका’ पुणे : ‘सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते; मात्र हल्लीचे पालक ‘रिअॅलिटी शो’ सारख्या कार्यक्रमांद्वारे मुलांवरचा संगीताचाच ताण वाढवतात. मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language